Posts

बँक कर्मचाऱ्यांनीच मारला खातेदारांच्या रक्कमेवर डल्ला.

Image
  खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर ट्रान्सफर करत खातेदारांची फसवणूक केली आहे. बँकेतील जे खाते मोबाईल नंबरसोबत लिंक नव्हते, त्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने हे पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले आहे. अंबरनाथ  - बँकेत तुमची रक्कम सुरक्षित असते असं नेहमीच म्हटलं जाते. मात्र, अंबरनाथ मधील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे मोबाईल नंबर लिंक नसलेल्या खातेदाराच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बँक कर्मचारी सुमित मंगलानीसह खातेदार विजय गुप्ताला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला अंबरनाथ पश्चिमेला बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेत क्लार्क म्हणून आरोपी सुमित मंगलानी काम करतो. या आरोपीने आपल्या बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या सर्व खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्याव